UC News

Airtel vs Vodafone Idea पाहा कोणाचा प्लान सर्वात बेस्ट

Airtel vs Vodafone Idea पाहा कोणाचा प्लान सर्वात बेस्ट

मुंबई: एअरटेल आणि वोडाफोन आयडियाने आपल्या टेरिफ प्लानमध्ये वाढ केली आहे. दोन्ही टेलीकॉम कंपन्यांकडून ग्राहकांना विविध रिचार्ज प्लान उपलब्ध करुन देत आहेत. एअरटेलच्या नव्या अनलिमिटेड प्लानची सुरुवात 149 रुपयांपासून सुरु होत असून 2399 रुपयांपर्यंत आहे. जाणून घेऊयात एअरटेल आणि वोडाफोन आयडियाच्या प्लानपैकी कोणता प्लान कसा आहे.

Airtel Rs 148 plan vs Vodafone Idea Rs 149 Plan:

एअरटेलच्या 148 रुपयांच्या प्लानची वैधता 28 दिवसांची आहे. या प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग, 2GB डेटा, 300 SMS मिळतात. तर वोडाफोन आयडियाच्या 149 रुपयांच्या प्लानची वैधता 28 दिवसांची आहे यामध्ये एफयूपी लिमिटसह अनलिमिटेड कॉलिंग (1000 मिनिट्स ऑफ नेट कॉलिंगसाठी), 2GB डेटा पूर्ण वैधतासाठी आणि 300 SMS मिळणार आहेत.

Airtel Rs 248 plan vs Vodafone Idea Rs 249 Plan:

एअरटेलच्या 248 रुपयांच्या प्लानची वैधता 28 दिवसांची आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, 1.5 डेटा प्रति दिवस, 100 SMS प्रति दिवस मिळतात. तर वोडाफोन-आयडियाच्या 249 रुपयांच्या प्लानची वैधता 28 दिवसांची असून यामध्ये अलिमिटेड कॉलिंग (1000 मिनिट्स एफयूपी ऑफ नेट कॉलिंग) 1.5 GB डेटा प्रति दिवस आणि 100 SMS प्रति दिवस मिळतात.

Airtel Rs 298 plan vs Vodafone Idea Rs 299 Plan:

एअरटेलच्या या प्लानमध्ये ग्राहकांना 28 दिवसांसाठी प्रति दिवस 2GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS प्रति दिवस मिळतात. तर वोडाफोन आयडियाच्या 299 रुपयांच्या प्लानची वैधता 28 दिवसांची आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग (1000 मिनिट्स ऑफ नेट कॉलिंग), 2GB डेटा प्रति दिवस आणि 100 SMS प्रति दिवस मिळतात.

Airtel Rs 598 plan vs Vodafone Idea Rs 599 plan:

एअरटेलच्या 598 रुपयांच्या प्लानची वैधता 84 दिवस असून यामध्ये दररोज 1.5GB डेटा आणि 100 SMS मिळतात. तर वोडाफोन-आयडियाच्या 599 रुपयांच्या प्लानची वैधता 84 दिवस असून यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग (3000 मिनिट्स ऑफ नेट कॉलिंग), 1.5 GB डेटा दररोज आणि 100 SMS मिळतात.

Airtel Rs 698 plan vs Vodafone Idea Rs 699 plan:

एअरटेलच्या 698 रुपयांच्या प्लानची वैधता 84 दिवसांची असून यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, 100 SMS दररोज आणि 2GB डेटा दररोज मिळतो. तर 699 रुपयांच्या वोडाफोन-आयडिया प्लानची वैधता 84 दिवस असून त्यात अनलिमिटेड कॉलिंग (एफयूपी 3000 मिनिट्स ऑफ नेट कॉल), 2GB डेटा दररोज आणि 100 SMS दररोज मिळतात.

READ SOURCE
Open UCNews to Read More Articles